तरुण उत्साही सेवा मंडळाचा भव्य रोजगार मेळावा !!

तरुण उत्साही सेवा मंडळाचा भव्य रोजगार मेळावा !!

       डिलाईल रोड-लोअर परेल येथील तरुण उत्साही सेवा मंडळ, यांनी येसीई हुमन कॅपिटल लिमिटेड यांच्या सहकार्याने, लोअर परेल येथील बीडीडी चाळ क्र २७ व ३२ मधील अभ्यासिकेत ना म जोशी मार्ग मुंबई ४०००१३ येथे माधी गणेशोत्सवाचे औचित्य साधून रविवार दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

       पाचवी, दहावी, बारावी, पदवी, पदविका, एमबीए, आयटीआय (ऑल ट्रेड), डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या युवक-युवतींनी, ज्यांचे वय १८ ते ४० वयोगटातील उमेदवारानी, स्वतः चा बायोडाटा व फोटो सह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे संतोष नेवरेकर (9869046876) यांनी कळविले आहे, या रोजगार मेळाव्याला, समाजसेवक- केशव पंदिरकर व साईनाथ रामपूरकर, मयूर कदम, सिद्धेश्वर चिखले, सागर तुर्डे यांची उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- भगवान सावर्डेकर (९८६९०४६८७६).


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week