ज्येष्ठाच्या रांगोळी, चित्रकला, हस्तकला स्पर्धेचा निकाल जाहीर..

ज्येष्ठाच्या रांगोळी, चित्रकला, हस्तकला स्पर्धेचा निकाल जाहीर..

       मुंबई गोरेगाव पूर्व येथील, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मकर संक्रात सणाचे औचित साधून जेष्ठांच्या रांगोळी, चित्रकला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

      चित्रकला-रांगोळी स्पर्धेत बाळ पंडित (प्रथम), दिलीप घारकर (द्वितीय) व ज्योती मारुलकर, अनुराधा रेडीज यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली.

       हस्तकला स्पर्धेत अश्विनी बोरगावकर, प्रथम व पूनम जाधव ह्या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. गीता तोरणे व नयना सिनकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली.

        ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन, अश्विनी बोरगावकर व अरुणा रसे  यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण निमा पंकज सावे यांनी केले होते. स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक संघाचे महिला-पुरुष मोठ्या संखेने सहभागी झाले होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week