
फुटपाथ वरील कचरा नियमित उचला संकल्प रहिवाश्यांची पालिकेला विनंती !!
फुटपाथ वरील कचरा नियमित उचला संकल्प रहिवाश्यांची पालिकेला विनंती !!
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील ज. अरुण कुमार वैद्य मार्गावर, संकल्प सोसायटी मोठी वसाहत आहे. संकल्प सोसायटीला लागून असलेल्या फुटपाथ वर कित्येक दिवस, कचरा, झाडाच्या फांद्या, माती पडून आहे. पालिकेचे कर्मचारी नियमित फुटपाथ वरील कचरा उचलत नाहीत.
परिणामी पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. फुटपाथ चालण्यायोग्य केल्यास अपंग गरोदर स्त्रियांना, बाजार रहाट करणार-या महिलांना सुरक्षितपणे फुटपाथचा उपयोग होईल. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन रोजच फुटपाथ वरील कचरा उचलावा अशी नागरिकांची मागणी आहे.