गोदरेज व्हेज ऑइल्स’च्या ‘सही शुरुआत’ या जाहिरातींसाठी मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते भाऊ कदम ब्रँड अॅम्बेसेडर !!

गोदरेज व्हेज ऑइल्स’च्या ‘सही शुरुआत’ या जाहिरातींसाठी मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते भाऊ कदम ब्रँड अॅम्बेसेडर !!

       मुंबई, 30 डिसेंबर ‘गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड’चा (गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिच्या असोसिएट कंपन्यांची होल्डिंग कंपनी) ब्रँड असलेल्या ‘गोदरेज व्हेज ऑइल्स’ने आपल्या जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते भाऊ कदम यांचे सहकार्य घेत असल्याची घोषणा आज येथे केली. 'सही शुरूआत विथ गोदरेज ऑइल्स' असे या जाहिरात मोहिमेचे नाव आहे.

     आपल्यापैकी बरेचजण छंद, आवड किंवा फुरसतीचे काम म्हणून स्वयंपाक करतात; तथापि, अन्न पदार्थांना आपल्या जीवनात एक मध्यवर्ती स्थान आहे. अन्न सेवन करण्याच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, तसेच त्यावेळचे क्षण आनंदात व्यतीत करतात. अन्न हे आपल्या जीवनातील सर्वात बहुमूल्य घटकांपैकी एक आहे. विविध पदार्थ, ते बनविण्याची पद्धत, त्यांची चव यांबाबतीत आपली प्रत्येक डिश ही अद्वितीय असते. मात्र स्वयंपाकाची प्रक्रिया ही बहुतेक वेळा एका मुख्य घटकापासूनच सुरू होते, ती म्हणजे स्वयंपाकाचे तेल. ‘गोदरेज व्हेज ऑइल्स’सह ही सुरुवात चांगली, ‘सही’ होऊ शकते. हीच संकल्पना या ब्रॅंडतर्फे मार्केटिंगच्या सर्व मोहिमांमध्ये वापरण्यात येणार आहे. 

       भाऊ कदम यांच्यासोबतच्या अनोख्या सहयोगामुळे सातत्य, शुद्धता, गुणवत्ता, विश्वास इत्यादी सामाईक वैशिष्ट्यांसह दोन आयकॉनिक ब्रँड एकत्र आले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पांडू’ या चित्रपटात अविस्मरणीय भूमिका करणारे आणि ‘चला हवा येऊ द्या’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिका गाजवणारे, भाऊ कदम, हे नवीन जाहिरातींमध्ये स्वयंपाक करताना दिसणार आहेत. ‘गोदरेज व्हेज ऑइल’ वापरून ते विविध महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करणार असून स्वयंपाकासंबंधीचे त्यांचे काही अनुभव ते प्रेक्षकांसह शेअर करणार आहेत. अनेक डिजिटल फिल्म्स आणि पोस्ट्स यांच्या माध्यमातून सेलिब्रिटी शेफ, शेफ वरुण इनामदार आणि शेफ तारा देशपांडे यांच्याशी भाऊ कदम मजेदार संभाषणदेखील करतील आणि त्यांच्यासोबत उत्सवी पाककृती बनवतील. हे सर्व व्हिडिओ ‘गोदरेज’च्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आणि सोशल मीडिया हँडल व इतर अनेक प्लॅटफॉर्म्सवर सादर केले जाणार आहेत. 

       ‘गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी संचालक आणि प्रेसिडेंट नितीन नाबर म्हणाले, “गोदरेज व्हेज ऑइल्स सही शुरूआत’ या जाहिरात मोहिमेचा एक भाग म्हणून भाऊ कदम यांची साथ मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. भाऊ कदम आणि ‘गोदरेज व्हेज ऑइल्स’ यांच्यामध्ये सातत्य, शुद्धता, गुणवत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास यांसारखी काही उल्लेखनीय व समान वैशिष्ट्ये आहेत. यामुळे आम्हाला खात्री आहे, की ही भागीदारी परस्परांसाठी फायदेशीर ठरेल.

‘गोदरेज’शी झालेल्या या सहयोगाबाबत भाष्य करताना, आघाडीचे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते भाऊ कदम म्हणाले, “गोदरेज हा आपल्या देशात मजबूत भारतीय मुळे असलेला, मोठा वारसा असलेला ब्रँड आहे. ‘गोदरेज व्हेज ऑइल्स’च्या ‘सही शुरूआत’ जाहिरातींचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करण्यास मी उत्सुक आहे. हा ब्रँड महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील घराघरांमध्ये नियमितपणे वापरला जातो. ग्राहकांना चांगल्या दर्जाचे स्वयंपाकाचे तेल पुरवत राहण्यासाठी मी या ब्रॅंडला शुभेच्छा देतो.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे