
मुंबई स्वराज संघटना विधान परिषदेचे कार्यसम्राट आमदार श्री सुनील गोविंद शिंदे यांनी केला जाहीर निषेध !!
मुंबई स्वराज संघटना विधान परिषदेचे कार्यसम्राट आमदार श्री सुनील गोविंद शिंदे यांनी केला जाहीर निषेध !!
कर्नाटक राज्याची राजधानी बंगळरू येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची विटंबना करण्याची घटना घडली. दिनांक १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा प्रकार कर्नाटक बंगळरू येथे घडला. त्यावेळेस कर्नाटक, कोल्हापूरची जनता रस्त्यावर उतरून त्यांनी संताप व्यक्त केला.
मुंबई विधान परिषदेचे कार्य सम्राट आमदार श्री. सुनील शिंदे यांनीही या घटनेचा जाहीर निषेध केला. महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची घटना बंगळुरू येथे घडली. ही घटना संताप जनक आहे. आणि घृणास्पद कृत्यांचा मी निषेध करतो, हे कृत करणाऱ्या समाज कंटाकावर कडक कारवाई व्हायलाच हवी.
"ह्या घटनेवर संताप जनक विधान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध"
कर्नाटक सरकारने सीमावादाच्या लढाईच्या आड असल्या कृत्यांना पाठीशी घालण्याची चूक करू नये !
महाराष्ट्रातील जनता हे कदापी सहन करणार नाही, सीमा प्रश्नात अंतिम विजय महाराष्ट्राचाच होईल, आणि तो मिळेपर्यंत महाराष्ट्र् स्वस्थ बसणार नाही.
आणि मी सुनील गोविंद शिंदे या घटनेचा जाहीर निषेध करतो, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार सुनील शिंदे यांनी म्हटले आहे.