दत्त जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न !

दत्त जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न !

        श्रीपंत भक्त मंडळ मुंबई, दत्त जयंती उत्सव मंडळ करिरोड, वंदे मातरम क्रीडा मंडळ व शिवकृपा रहिवाशी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सदाशिव भोसले यांच्या मार्गदर्शनाने व श्री दत्त जयंती उत्सवानिमित्ताने श्री हनुमान मंदिर शिवकृपा इमारत स्व. स बा पवार मार्ग करिरोड मुंबई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

          के. इ. एम. हॉस्पिटल परेल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात ८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

        रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अवधूत निकम, संजय हातकर, विश्वनाथ डाकवे, भीमराव तिप्पे, मारुती नाईक व श्रीपंत भक्त बंधू, शिवकृपा रहिवासी संघ यांचे मोलाचे सहकार्य होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week