
बेस्टने मासिक पास द्यावेत ! बेस्ट प्रवाश्यांची मागणी...
बेस्टने मासिक पास द्यावेत ! बेस्ट प्रवाश्यांची मागणी...
रेल्वे प्रशासनाने ज्यांनी दोन लसी घेतल्यात त्यांना तिकिट व मासिक पास देण्याचे सुरू केले. आता शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपन्या शाळा - कॉलेज सुरू झाल्याने रेल्वे व बस प्रवाश्यांत वाढ झाली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट व मासिक पास देण्याचा निर्णय घेतला.
मात्र बेस्ट प्रशासन प्रवाश्यांना तिकिटे देत आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानका बाहेर बेस्ट डोपो आहेत. बेस्ट तिकीट कमी प्रवासा साठी रु.५ व एसी रु.६/- असल्याने सुटे पैश्याची फारच चणचण भासते. वाहक व प्रवासी यांच्यात तू-तू-मै-मै होत असते, बेस्ट प्रशासनाने मासिक पास वितरण केल्यास प्रवाश्याना सुटे पैसे सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.
बेस्ट प्रशासनाने ज्यांनी दोन लस घेतल्या आहेत, अश्या प्रवाश्याना व शालेय विद्यार्थांना मासिक पास द्यावेत. अशी बेस्ट प्रवाशांची मागणी आहे.