
जॉली उत्सव मंडळाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल !!
लोअर परळ पूर्व येथील बी डी डी चाळ २५-२६ येथे जॉली उत्सव अंतर्गत बाळ गोपाळ नवरात्रो उत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे हे ४६ वे वर्ष असून मंडळाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे.
मंडळ प्रत्येक वर्षी देवीची विविध रूपे व आरास करीत असून त्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असतो. या वर्षी देवी समोर विविध फुलांची आरास केली होती. तसेच भजन, विद्यार्थी गुणगौरव, आरोग्य व दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या कला गुणांना चालना मिळण्यासाठी हस्तांक्षर, निबंध, चित्रकला स्पर्धेचेही आयोजन केले होते. तसेच होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन देवीच्या मंडपात करण्यात आले होते. उत्सव कालावधीत ५६ भोग नैवेद्य निष्ठान पदार्थांचा नेवेद्य देवीला अर्पण केला होता. मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा करण्यात आलेला असून त्यात तरुण मुलांचा जास्त सहभाग होता.
या वर्षी प्रशांत तोरसकर (अध्यक्ष), उपाध्यक्ष- उमेश शेलार, कार्याध्यक्ष- योगेश आंब्रे, चिटणीस- अनिल जाधव, उपचिटणीस- संतोष येसणे, कोषाध्यक्ष- सुधीर लाड व हर्षल सावंत हे पदाधिकारी आहेत.