
कोल्हापूर जिल्हा युवा प्रतिष्ठान च्या वतीने मोफत कोविड लसीचे वाटप !!
कोल्हापूर जिल्हा युवा प्रतिष्ठान च्या वतीने मोफत कोविड लसीचे वाटप !!
कोल्हापूर जिल्हा युवा प्रतिष्ठान, मानखुर्द, मुंबई च्या वतीने विभागातील नागरिकांना मोफत कोविड 19 लसीकरण कार्यक्रम नुकताच, विठ्ठल रखुमाई मंदिर शेजारील सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अपंग नागरिकास कोवी शिल्डचा पहिला डोस देवून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
प्रिन्स अली खान रूग्णालयाच्या सहकार्याने व कोल्हापूर जिल्हा युवा प्रतिष्ठान मानखुर्द, यांच्या वतीने राबवलेल्या कोविड 19 लसीकरण कार्यक्रमात ३०० नागरिकांना मोफत लस देण्यात आली.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक विठ्ठल लोकरे, कार्यशील नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष- संदीप नांदवडेकर, उपविभाग प्रमुख -मधुकर कणसे, शिवाजीनगर उपविभाप्रमुख अरुण हुले, महिला उपविभाग प्रमुख- प्रद्या सकपाळ, शाखा प्रमुख -रोहिदास ढेरंगे, कार्यालय प्रमुख- किसन जाधव, महिला शाखासंघटक-लताताई कारंडे, यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.