
पश्चिम रेल्वे आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई एक्लेसी वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न !
पश्चिम रेल्वे आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई एक्लेसी वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न !
पश्चिम रेल्वे आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई एक्लेसी यांच्या वतीने व फोर्टिस रुग्णालय यांच्या सौजन्याने महाआरोग्य शिबीर नुकतेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आयोजित केले होते.
या शिबिरात पश्चिम रेल्वेचे अधिकारी सिनियर स्टेशन मास्तर -एस. आर. सरावता, संजय शर्मा (Deputy Stn.Master), सिननीयर टिकिट कलेक्टर जयेश गांधी, जी. आर. पी. एफ. सब इन्स्पेक्टर- माधवराव रोकडे, जी आर.पी एफ.सब इन्स्पेक्टर -बारी, फोर्टिस रुग्णालयाचे -जसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
स्टेशन मास्तर कार्यालयासाठी लायन्स क्लब ऑफ मुंबई, एक्लेसीच्या वतीने सॅनिटायझर मशीन देण्यात आले. तसेच ८०० मास्कचे वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरात - १५० नागरिकांनी- रेल्वे कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी - लायन जगराम मोर्या, लायन भरत पंडित, लायन प्रमोद तिवारी, मिलींद, पीटर, सैम्यूल पाटोळे यांचे विशेष सहभाग लाभला.