
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
बालमोहन विद्यार्थी-पालक उत्कर्ष समितीच्या वतीने अभ्युदय नगर येथील अहिल्याबाई शाळा हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे पदाधिकारी आणि सिनेट सदस्य निखिल जाधव तसेच समाजसेवक मुस्ताक नाखवा, उद्योजक अजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विभागातील अनेक मान्यवर मंडळी सामाजिक संस्था तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी भेट दिली या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक आमदार अजय चौधरी, नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी विशेष उपस्थिती लावली त्याच शिबिराला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हे शिबिर यशस्वी केले.