
पर्यावरणपूरक मूर्तिकारांना मुंबईतील मूर्तिकारांची साथ...
पर्यावरणपूरक मूर्तिकारांना मुंबईतील मूर्तिकारांची साथ...
कोकणात झालेल्या पुरामुळे महाड, चिपळूण मध्ये तेथील गणेश मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या मूर्तीकाराच्या मदतीसाठी मुंबईतील श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना मुंबई यांनी पूरग्रस्त मूर्तीकारांना एक तयार गणेश मुर्ती द्यावी असे आवाहन मुंबई स्थित मूर्तिकाराना नुकतेच केले होते.
संघटनेने केलेल्या आवाहनाला मुंबईतील गणेश मूर्तिकारानी उत्तम प्रतिसाद दिला.
मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार- निलेश निवाते (माझगाव)- १५ मूर्त्या, राहुल झुंझारराव (शहापूर), सागर चितळे (माटुंगा), अनिल बाईंग (कांदिवली), चेतन परमार (वरळी) हे प्रत्येकी ११ मूर्त्या देणार आहेत . तसेच निलेश भालेराव (कुर्ला), रत्नेश लोटलीकर (अंधेरी-पूर्व), भूषण कानडे (भांडुप-पश्चिम), प्रतीक पाटील प्रभादेवी),विजय चूमन (कामाठीपुरा, अमेय कांदलगावकर (मुंबई सेंट्रल), राजू चव्हाण ( डोंबिवली-पूर्व), नंदकिशोर शिवलकर (बोरिवली) हे प्रत्येकी पाच मुर्त्या पाठविणार आहेत. तसेंच भावेश आंगचेकर (अंधेरी-पूर्व), हितेश समेळ), सुयोग मालनकर (मुलुंड-पूर्व), जितेंद्र जोशी( डोंबिवली) व विनेश नवसुपे (धारावी) हें सुद्धा गणेश मुर्त्या पूरग्रस्त मूर्तिकारांना पाठविणार आहे.
असे साई रामपूरकर यांनी कळविले आहे. आणखी मुर्त्या ज्या मूर्तीकाराना द्यावंयाचा असतील तर सुरेश शर्मा ९९६९६८७२४२ व निलेश नेवाते ९८९२७०२७१४ यांच्याशी संपर्क साधावा.