शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वाढदिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
शिवसेना दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचा वाढदिवस सर्व शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ श्रीफळ आणि शाल देऊन साजरा केला या समारंभात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला या समारंभात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी शंकर झोरे, सुरेश कोळी तसेच विभागतील नागरिकांनी, विविध संस्थांनी मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकपाळ यांना शुभेच्छा दिल्या.
या समारंभात ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकपाळ हे नेहमी चांगले काम करत असून त्यांच्या कार्याची पोचपावती संपूर्ण विभागात आहे. त्यांचे कार्य हे जनसामान्य पर्यंत पोचले असून तळागाळातील जनता त्यांच्या कार्यावर खुश आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली आहे अशी माहिती रविंद्र पांचाळ या ज्येष्ठ शिवसैनिक यांनी दिली. या समारंभात बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.