
मुंबई ई वॉर्ड आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात !!
मुंबई ई वॉर्ड आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात !!
बृहन्मुंबई महानगरपालिका " ई " विभाग भायखळा येथील सर्व आरोग्यकेंद्र त्याचप्रमाणे रिचर्डसन अँड क्रूडास कोविड केअर सेंटर मधील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचरिका व बहुउद्देशीय कर्मचारी ( MPW) ह्यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक निधी जमा करण्यात आला. पूरग्रस्तांना मदत म्हणून काढलेली रक्कम ई विभागाचे A E आयु.अभय जगताप यांच्या शुभहस्ते भायखळा विधान सभेच्या आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांच्याकडे मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने कोरोना योद्धा उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांनी पूरग्रस्तांना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल सर्व कोरोना योद्धांचे आभार मानले व ज्यावेळेस संपूर्ण मुंबई शांत होती, प्रत्येक नागरिक आपला जीव मुठीत ठेऊन घरीच थांबत होता त्यावेळेस आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या सर्व कोरोना योद्धांच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले. तसेच पुरग्रस्थानसाठी जमा केलेला निधी " मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येईल असे सांगितले.