
चिंचपोळी ब्रिज वरून वरळीकडे जाणा-या बसेस करिरोड ब्रिज वरून न्याव्यात ....
चिंचपोळी ब्रिज वरून वरळीकडे जाणा-या बसेस करिरोड ब्रिज वरून न्याव्यात ....
मुंबई डिलाईल रोड येथे ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशन बस स्थानक असून तेथे वरळीला जाणा-या बस क्र.४४,५०, ५७, १६६ साठी थांबा आहे. परंतु त्या मार्गाने वरळी ची एकही बस जात नाही. परिणामी प्रवासी मात्र बस थांब्या वर लिहिल्या प्रमाणे तासन तास बससाठी वाट पहात असतात. शेवटी कंटाळून जातात.
बस क्र. ५०, ४४, ५७, १६६ या बसेस चा मार्ग लालबाग, भारतमाता, करिरोड , ना म जोशी मार्ग, आर्थर रोड, सात रस्ता, महालक्ष्मी स्टेशन मार्गे वरळी असा आहे. परंतु बस चालक मार्ग बदलून चिंचपोकळी स्टेशन- आर्थर रोड नाका मार्गे वरळी साठी बसेस नेतात.
लालबाग, भारतमाता, करी रोड, डिलाईल रोड परिसरातील नागरिकांना याचा फारच त्रास सहन करावा लागत आहे.
बेस्ट प्रशासनाने याची दखल घेऊन वरळी येथे जाणा-या बसेस दिलेल्या मार्गानेच न्याव्यात असे आदेश पारित करून बस प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी विभागातील नागरिकांची मागणी आहे.