
दिव्यांगा करिता तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप !!
दिव्यांगा करिता तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप !!
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया खिलाफत कमिटी सभागृह भायखळा येथे प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांच्या नगरसेवक निधीतून तसेच शिवसेना माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप आणि अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले .
याप्रसंगी विभाग क्रमांक ११ चे विभागप्रमुख व बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबुरकर, भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक रमाकांत रहाटे, सिनेट सदस्य निखिल जाधव, भायखळा विधानसभा संघटक विजय दावू लिपारे, युवासेनेचे सिद्धेश मंडलिक, शाखाप्रमुख हेमंत मयेकर, महिला शाखा संघटक मेघा भोईर, महिला युवती अधिकारी श्रद्धा वाघमारे तसेच उपशाखा प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश सिंग, रोनी बगेडिया, जाफिरी भाई तसेच बहुसंख्य कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.