मनसे जनहित कक्ष व विधी विभाग सरचिटणीस पदी - सुनिल शिरसेकर यांची नियुक्ती

मनसे जनहित कक्ष व विधी विभाग सरचिटणीस पदी - सुनिल शिरसेकर यांची नियुक्ती

      महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख - राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष - किशोर शिंदे यांच्या सूचनेनुसार सुनिल प्रभाकर शिरसेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यामुळे मनसे वरळी व मलबार हिल विधानसभा यांच्या वतीने सुनिल शिरसेकर यांचा सत्कार ना म जोशी मार्ग मनपा शाळे जवळ श्रमिक जिमखाना करी रोड (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला होता.

         मनसे मुंबई सरचिटणीस - ऍड. अर्चित साखळकर, उपाध्यक्ष- वसंत प्रभू, मलबार हिल विभाग संघटक - उमेश कंठक व शाखा संघटक- निलेश सावंत तसेच वरळी विभाग संघटक - गौरव सकपाळ यांनी शिरसेकर यांना शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला व सरचिटणीस पदावरील पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.

      सुनिल शिरसेकर यांनी उपस्थित पदाधिका-यांना मार्गदर्शन करून आभार मानले. सत्काराला नरेश सोळंकी, कुणाल मर्चंडे, प्रतीक गंभीर, रोशन निकम, हृतिकेश कोरगावकर, ओंकार पोटे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सत्कार समारंभाचे सूत्र संचालन - गौरव सकपाळ यांनी केले.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week