प्रतीक्षा नगर येथील म्हाडाच्या सदनिका नावावर करा !

प्रतीक्षा नगर येथील म्हाडाच्या सदनिका नावावर करा !

        प्रतीक्षा नगर येथील म्हाडाच्या मुबंई मंडळाच्या १४८ कोड अंतर्गत सुमारे २० वर्षांपूर्वी वितरित करण्यात आलेल्या सदनिका धारकांच्या सदनिका अजूनपर्यंत नावावर होत नसल्याने संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुबंई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. योगेश म्हसे ह्यांच्या दालनांत बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत विभागप्रमुख, नगरसेवक श्री. मंगेश सातमकर, नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रामदास कांबळे साहेब ह्यांनी बैठक आयोजित केली होती त्यावर सविस्तर चर्चा करून सर्व ४६२ सदनिका धारकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा असे सांगण्यात आले त्यावर संबंधित विषयाचा अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश मुख्य अधिकारी श्री. योगेश म्हसे ह्यांनी दिले आहेत.


       सदर विषयावर रहिवासी वर्गाचे सल्लागार म्हणून नेमणूक केलेले श्री. करण नाईक ह्यांनी विषयाबद्दल सविस्तर माहिती व सत्य परिस्थिती समोर आणली या बैठकीत इमारतीचे रहिवासी, उपशाखाप्रमुख श्री. गणेश शिंदे उपस्थित होते.


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week