
कुणी घर देता का घर ?
कुणी घर देता का घर हे वाक्य मुबंई मधील गिरगाव येथील दुर्गादेवी सहकारी संस्था (नियोजित)१/३/५,३४६-३५२ मौलाना आझाद रोड, गिरगाव मुबंई-०४ येथील रहिवासी वर्गास एकदम योग्य लागू होते.
गिरगाव मुबंई येथील सदर इमारत १९७४ साली म्हाडा प्राधिकरणाकडून धोकादायक म्हणून खाली करून निष्कसित करण्यात आली आणि तब्बल 46 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सदर इमारत 2008 साली म्हाडा कडून टेंडर काढून सतीश कन्स्ट्रक्शन ह्यांना देण्यात आली, पण अडचणी कमी होण्या ऐवजी वाढतच गेल्या इमारत बांधकामास सुरुवात झाली, पण चुकीचे नियोजन आणि म्हाडाचे दुर्लक्ष असल्याने बांधकाम चुकीचे झाले, त्यामध्ये इमारतीचे प्रवेशद्वार फक्त साडेपाच फुटाचे बनवले, जुने बेस्टचे सब स्टेशन न काढता बांधकाम चालू ठेवले, महानगरपालिके तर्फे देण्यात आलेल्या सूचना न पाळता बांधकाम केले म्हणून महानगरपालिके तर्फे भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाली नाही आणि त्यामुळे परत रहिवासी वर्गास स्थलांतर मिळण्यासाठी वेळ लागला, ह्यामध्ये म्हाडातर्फे परत काम थांबले म्हणून वाढीव रक्कम म्हणून कंत्राटदाराला पैसे वाढवून देण्यात आले आणि मग रहिवासी वर्गाच्या पाठपुराव्यामुळे म्हाडा भोगवटा प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर सन 2018 मध्ये म्हाडा कडून त्यावेळी नवनियुक्त सभापती श्री. विनोद घोसाळकर ह्यांच्या हस्ते त्यांच्या घरांची सोडत काढण्यात आली, पण आजतागायत म्हाडाच्या जाचक अटींमुळे रहिवाशांना अजून स्थलांतर मिळाले नाही.
ह्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा तेथिल स्थानिक शिवसेना विभागप्रमुख श्री. पांडुरंग संकपाळ आणि श्री. मंगेश सातमकर करत आहेत त्याबातीत म्हाडा सभापती श्री. विनोद घोसाळकर ह्यांच्याकडे मंगळावर दिनांक १३/०७/२१ रोजी दुपारी 4 वाजता म्हाडा अधिकारी व रहिवासी वर्गाची बैठक आयोजित करण्यात आली होती,
बैठकीत सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी येत्या महिन्यात सर्व रहिवाशांना म्हाडा अधिकारी वर्गाने सहकार्य करून लवकरात लवकर स्थलांतर करावे असे आदेश दिले आहेत.
श्री. पांडुरंग संकपाळ ह्यांनी रहिवासी वर्गाचे लवकरच आम्ही घोसाळकर साहेबांच्या माध्यमातून स्थलांतर करून घेऊ असे सांगितले आणि सभापती ह्यांनी म्हाडाकडून लावण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करून त्याबाबतीत म्हाडा सर्व अधिकारी वर्गास तश्या सूचना केल्या आहेत.
बैठकीत इमारतीतर्फे इमारतीचे कायदेशीर सल्लागार म्हणून ज्यांची नेमणूक केली आहे ते श्री करणं नाईक ह्यांनी म्हाडा सभापती व अधिकारी वर्गास चित्रफीती द्वारे इमारतीच्या रहिवासी वर्गाच्या व्यथा मांडल्या होत्या त्याचे कौतुक सभापती ह्यांनी केले व सदर बैठकीनंतर इमारतीचे सचिव श्री. गणेश शिंदे व सर्व रहिवासी वर्गाने सभापती श्री. विनोद घोसाळकर, विभागप्रमुख श्री. पांडुरंग संकपाळ, विभागप्रमुख, नगरसेवक श्री. मंगेश सातमकर व म्हाडा अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले आहेत.