
स्वप्नील टाकळे यांची राष्ट्रवादी वॉर्ड क्र 208 च्या अध्यक्षपदी निवड !
स्वप्नील टाकळे यांची राष्ट्रवादी वॉर्ड क्र 208 च्या अध्यक्षपदी निवड !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोडपदेव प्रभाग क्रमांक 208 च्या अध्यक्षपदी विभागातील युवा समाजसेवक स्वप्निल टाकळे यांची निवड राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र देऊन केली. टाकळे यांनी विभागात केलेल्या कामाची ही पोचपावती असून यापुढे देखील असेच चांगले कार्य करत राहावे अशी अपेक्षा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. यावेळी नवाब मलिक, राष्ट्रवादीचे भायखळा तालुका अध्यक्ष प्रवीण खामकर, अनिल तटकरे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.