मुंबई प्रेस क्लब येथे शहीद दानिश सिद्दीकी फोटोग्राफरला श्रद्धांजली !

मुंबई प्रेस क्लब येथे शहीद दानिश सिद्दीकी फोटोग्राफरला श्रद्धांजली !

        अफगाणिस्तानातील तालिबानी हल्ल्यात शहीद झालेल्या रायटर न्यूज एजन्सीचे फोटोग्राफर दानिश सिद्दीकी ला मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार आणि फोटोग्राफर यांनी श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजली सभेमध्ये मोठ्या संख्येने पत्रकार आणि फोटोग्राफर उपस्थित होते त्यांनी मेणबत्ती पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.



         या श्रद्धांजली सभेमध्ये हत्येच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई प्रेस क्लबच्या वतीने मोठ्या संख्येने पत्रकार आणि फोटोग्राफर उपस्थित होते. यात ज्येष्ठ पत्रकार समर खडस, घनश्याम भडेकर, प्रवीण काजरोळकर, रविंद्र भोजने आदी मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर