भायखळ्यात केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन !

भायखळ्यात केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन !

           भायखळा विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या विरोधात भायखळा आगरीपाडा विभागात जोरदार निदर्शने करण्यात आली. महागाई कमी करा नाही तर खुर्ची खाली करा, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा विविध घोषणानी परिसर दणाणून गेला.


    या निदर्शनांमध्ये मुंबई काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण, भायखळा विधानसभा ओबझर्वर संदीप शुक्ला, ब्लॉक क्रमांक 212 चे ब्लॉक अध्यक्ष शमीम अन्सारी, युवा नेते अतिफ अन्सारी, अभिजित खामकर, हिना कानोजिया, विजय कानोजिया, कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week