उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने विद्यार्थींना मोफत वह्या वाटप !

उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने विद्यार्थींना मोफत वह्या वाटप !

        मुंबई ना म जोशी मार्गावरील एक अग्रगण्य संस्था उत्कर्ष सेवा मंडळ गेली १५ वर्षे लोअर परळ विभागात ज्ञान, कला, क्रीडा माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. मंडळ "उंबरठा" राज्य स्थरीय एकांकिका स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मंडळाला कोणतेही उपक्रम राबविता आले नाहीत.

        उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच १९ हरहरवाला इमारत येथे मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाला. प्रमुख अतिथी मर्चंट नेव्हीचे कॅप्टन- सदाशिव गोविलकर, साप्ताहिक कोल्हापूर विशेष चे संपादक- सुरेश शिंत्रे व ज्येष्ठ पत्रलेखक, पत्रकार- बाळ पंडित उपस्थित होते. 

         प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळाच्या वतीने १५० विद्यार्थींना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

        या सोहळ्यास मंडळाचे - अध्यक्ष- श्यामराव चौगुले, उपाध्यक्ष - अनंत माळकर, चिटणीस - कृष्णा कदम, कोषाध्यक्ष - सुधाकर कदम, शिक्षण प्रमुख - अमोल गुडेकर व सुरेश चव्हाण, दुर्वास कदम, श्यामसुंदर खैर, सुधीर आजगावकर आदी सभासद उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week