
डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कार सोहळा आज नाशिक येथे संपन्न !
डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कार सोहळा आज नाशिक येथे संपन्न !
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री श्री. बबनराव घोलप (नाना) यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन जिल्हा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश सरचिटणीस, मुख्य कॅबिनेट सल्लागार व प्रचार व प्रसार विभागाचे प्रमुख डॉ. शांताराम कारंडे आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती. संगीता रोहिदास वाघमारे यांनी केले. राष्ट्रीय कीर्तनकार वाबळे महाराज, माजी महापौर व महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ. स्नेहल आंबेकर ताई, प्रदेश सचिव श्री. दत्तात्रय गोतीसे, मुंबई विभागीय अध्यक्ष श्री. राजेश खाडे, श्री. सुर्यकांत आंबेकर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.