श्री. दत्त भक्त नानु खोत यांना देवाज्ञा !

श्री. दत्त भक्त नानु खोत यांना देवाज्ञा !

     मुंबई : डिलाईल रोड येथील, आपोलो मिल मधील मंदिरातील, श्री. दत्त गुरूंची व सद्गुरू श्री. पंत महाराज (बाळेकुंद्री) यांची मागील २१ वर्षे अहोरात्र सेवा करणारे नानु गणू खोत यांचे (दि २१ जून) वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांच्या गावी हृदय विकाराने निधन झाले.

          कै. नानु खोत यांचा जन्म १ जून १९४५ रोजी कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी तालुक्यातील जठार वाडी येथे झाला. गावी शालेय शिक्षण घेऊन ते सन १९९८ मध्ये आपोलो मिल मध्ये वायडिंग खात्यात कार्यरत झाले. जेवणाच्या वेळेत ते दत्त मंदिरात साफ सफाई करीत असत. सन २००८ मध्ये मिल बंद झाल्या नंतर गावी न जाता दत्त मंदिरात पूर्ण वेळ अल्प मोबदल्यात श्री. दत्त सेवेत रुजू झाले. दत्त मंदिर निर्माण कार्यात त्याचा पूर्ण सहभाग होता.

       त्याचा स्वभाव मनमिळाऊ होता. प्रत्येक आलेल्या भक्ताची ते चौकशी करीत. रोज नित्य नियमाने सकाळी ७ वा व सायं ७-३० वा  आरती करीत. ते फार शांतता प्रेमी होते. स्वतः चा स्वार्थ कधी पाहिला नाही, तसेच आलेल्या भक्ताशी कधी भेदभाव केला नाही. लहानपणा पासून ज्ञानेश्वरी  व हरिपाठ वाचनाची आवड होती. मंदिरात ते फावल्या वेळेत ग्रंथ पठण करीत असत. 

       सन १९९८ ते २०२१ या कालावधीत त्यांनी (१९ वर्षे) श्री दत्त सदगुरुची सेवा मनोभावे श्रद्धेने व निष्ठेने केली.

        कै. खोत यांच्या आकस्मित निधनाने मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे. आपोलो मिल दत्त भक्त परिवार व श्रीपंत भक्त मंडळ यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week