
रीनैसंस द सस्टे या पुस्तकाचे प्रकाशन थांबवा, विजय बल्लाळ संभाजी ब्रिगेड !
रीनैसंस द सस्टे या पुस्तकाचे प्रकाशन थांबवा, विजय बल्लाळ संभाजी ब्रिगेड !
पत्रकार गिरीश कुबेर यांच्या "रीनैसंस द सस्टे" या पुस्तका मधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब याच्यां विषयी आक्षेपार्ह लिखाण लेखक कुबेर यांनी केले आहे. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्र वासियांची मान शरमेने खाली जाईल. इतिहासक, संशोधक, अभ्यासक याच्यां भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे पत्रक संभाजी ब्रिगेड ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिले आहे.
"रीनैसंस द सस्टे" पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी व जो पर्यंत लेखक "गिरीश कुबेर आणि प्रकाशक हार्पर कालिंस" हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढुन टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत, कुबेर हे दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात ते अभ्यासातुन प्रकटतात असेही बोलले जाते, छत्रपती संभाजी महाराजांविषयी अज्ञानातून लेखन झालेले आहे. त्यामुळे कुबेर हे त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजां विषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात यामागे त्यांचा हेतु काय आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजे आपण या संवेदनशील विषयामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कालिंस याच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्याव्यापी आंदोलन करु असे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष विजयभाई बल्लाळ यांनी सांगितले आहे.