
आर्थर रोड येथील ओम साई सदन इमारतीच्या समोरील रानटी झाडांची छाटणी करावी रहिवाशांची मागणी !
आर्थर रोड येथील ओम साई सदन इमारतीच्या समोरील रानटी झाडांची छाटणी करावी रहिवाशांची मागणी !
ना म जोशी मार्गावर, आर्थर रोड नाक्यावर अथर्व इमारतीच्या मागील बाजूस, ओम साई सदन इमारत आहे. इमारतीच्या समोर श्रीपती बिल्डर च्या अखत्यारीत असलेल्या मोकळ्या जागेत, रानटी झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. झुडपात मच्छर, बारीक डास व सरपटणारे प्राणी सुद्धा आहेत. आता पावसाळा सुरू झाला असून मलेरिया सारखे आजार उद्भाभवण्याची फार शक्यता आहे.
सद्या सर्व रहिवाशी कोविडच्या आजाराने भयभीत झाले आहेत. त्यातच डासांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. हा त्रास मंत्री प्राईड व अथर्व इमारती मधील रहिवाशांनाही आहे.
ग -दक्षिण प्रभाग अधिकारी यानी ओम साई इमारती समोरील वाढलेली अनावश्यक झाडे छाटावी. व रहिवाशांना डासांचा त्रासातून मुक्त करून दिलासा द्यावा. असे ओम साई इमारतीचे सचिव- रमाकांत देसाई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.