बहारदार सादरीकरणाने रंगला 'रंगीला रे !!

बहारदार सादरीकरणाने रंगला 'रंगीला रे !!

         सुरमयी तराणा, लयबद्ध आलाप, एकाहून एक सरस स्वरांनी रंगलेली जुगलबंदी अशा बहारदार सादरीकरणाने पार्लेकर रसिक जागतिक रंगमंचदिनी मंत्रमुग्ध झाले. विलेपार्ले येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध रागांमधील रचना आणि बंदिशी सादर करून नव्या दमाच्या कलाकारांनी मैफलीत रंग भरले.

         निमित्त होते, ते म्युझिक मंत्र तर्फे आयोजित रंगीला रे' ह्या उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कार्यक्रमाचे.

     सुप्रसिद्ध अभिनित्री महेमा मकवाना व रफी फाउंडेशनचे बिनू नायर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. 

        म्युझिक मंत्र चे संस्थापक डॉ. स्मिता डोंगरे, सुनील खोबरेकर, रमेश पुजारी यांनी  लॉकडाउन काळात विविध ऑनलाइन संगीत कार्यक्रम आयोजिले होते. 

       संगीत तणावासाठी सर्वोत्तम थेरपी आणि संगीताद्वारे आनंद पसरविण्याचा प्रयत्न" हीच म्युझिक मंत्रची 'टॅग लाईन' असल्याचे त्यांनी सांगितले.

        या प्रसंगी सर्व कलाकारांना स्मृतिचिन्ह आणि मास्क प्रदान करण्यात आले. रसिक श्रोत्यांसाठी 'लकी ड्रॉ ' चे सरप्राईजदेखील ठेवण्यात आले होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर