
वृत्तपत्र विक्रेत्यांनी मानले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार !
वृत्तपत्र विक्रेत्यांनी मानले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार !
कोरोनातही वर्तमानपत्र घेऊन वाचण्यात कोणताही धोका नाही, हे जागतीक आरोग्य संघटनेने जाहिर करुनही आज काही प्रमाणात वर्तमापत्राबाबत गैरसमज होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावर रुग्णालयात असतांना वर्तमानपत्र वाचतांना व्हिडिओ शेर केला त्यामुळे वर्तमानपत्र सुरक्षित आहे हा संदेश जनमाणसात गेल्यामुळे वर्तमानपत्राबाबत गैरसमज दुर होण्यास मदत झाली त्या निमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांनी शरद पवार यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आभार मानले तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी निवेदनावर उपमुख्यमंत्री अजित दादांचा वेळ घेऊन लवकरात लवकर आपल्या समस्या संदर्भात एक बैठक बोलविण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी मुंबई ठाणे एकीकरणचे प्रमुख अजित पाटील, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, दादर वृत्तपत्र विक्रेता संघाचे सुशांत वेंगुर्लेकर व कल्याण वृत्तपत्र विक्रेता संघाचे घनशाम यादव उपस्थितीत होते.