
म्हाडाचा अजब कारभार ?
म्हाडाचा अजब कारभार न्यायाच्या प्रतीक्षेत सायन येथील प्रतीक्षा नगर येथील रहिवासी श्री सोपान मारुती शिंदे वय वर्ष ८२"
सायन येथील प्रतीक्षा नगर मधील रहिवासी श्री सोपान मारुती शिंदे ह्यांचे वय ८२ वर्ष असून त्याचे १९९९ साली ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे. सन १९७४ साली ते प्रतीक्षा नगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात वास्तव्यास आले असून घराची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांनी १९७८ पासून ते प्रतीक्षा नगर येथे व्यवसाय करू लागले, त्यांनतर म्हाडाने सदर ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना लाल कलर्सचे फोटो पास देऊन त्यांच्याकडून रीतसर भाडे आकारले जाऊ लागले व सर्व कायदेशीर पुरावे त्याच्याकडे आहेत.
साधारण १९९९ पासून प्रतीक्षा नगरचा विकास करण्यासाठी म्हाडाकडून शिर्के कंपनीला काम देण्यात आले, त्यामुळे प्रतीक्षा नगरचा पुर्नविकास होऊ लागला मग त्यामध्ये असे जे व्यवसायिक व्यवसाय करत होते त्यांना म्हाडाकडून रीतसर संक्रमण शिबीराच्या दुकानी गळ्यात स्थलांतर देण्यात आले, श्री सोपान शिंदे ह्यांचे दुकान पण सदर विकासात येत होते व ते व्यवसाय करत असलेल्या सध्याच्या पत्याप्रमाणे नवीन ईमारत क्र एम ९च्या आतमध्ये त्यांचे दुकान होते पण साधारण सन २००८ साली सदर इमारतीची सुरक्षा भिंत बांधताना त्यांचे दुकान मध्ये येत होते म्हणून त्यांना म्हाडा व शिर्के कंपनीकडून स्थलांतर देतो असे सांगून ते तोडण्यात आले आणि आज तागायत त्यांना स्थलांतर देण्यात आले नाही.
सदर बाबतीत त्यांनी त्यावेळी म्हाडा अध्यक्ष श्री उदय सामंत व श्री विनोद घोसाळकर ह्यांच्याकडे न्याय मागितला असता त्यांनी त्यांना सहकार्य करून त्यांचा नियमानुसार म्हाडा प्राधिकरण बैठकीत प्रस्थाव मांडून मंजुरी मिळवली होती पण आजतागायत म्हाडा अधिकारी वर्गाकडून त्यांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे ते काही महिन्यांपूर्वी म्हाडा उपाध्यक्ष श्री डिग्गीकर ह्यांना भेटले असून त्यांना न्याय मिळत नाही म्हणून तक्रार केली व त्याप्रमाणे म्हाडा उपाध्यक्ष ह्यांनी सदर बाबतीत तातडीचा अहवाल मगिविला व सदर बाबतीत सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाची बैठक देखील घेण्यात आली व त्यांच्या दुकानावर पाहणी देखील केली गेली.
गेली बारा वर्षे झाली ते आपल्या दुकानाच्या स्थलांतर विषयी म्हाडा प्राधिकरणाकडे चकरा मारत आहेत पण अधिकारी वर्ग त्यांना स्थलांतर देत नाही. त्यामुळे ते थकले असून त्यांना रोज मानसिक त्रास होत आहे. ते कधी लवकर न्याय मिळतो ह्या प्रतीक्षेत असून जर म्हाडा कडून आता त्यांना न्याय मिळाला नाही तर म्हाडाच्या कार्यालयात जाऊन तिथेच बसून राहणार आणि स्थलांतर मिळत नाही तोपर्यंत तिथून जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
सायन येथील प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरात जवळपास ५० च्या वर दुकाने रिकामे असून म्हाडाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे अश्या रीतसर व्यवसाय करणाऱ्या दुकानदार वर्गाला जर म्हाडाने स्थलांतर दिले तर म्हाडाचे पण उत्पन वाढले आणि रिकाम्या गळ्यात घुसखोरी होणार नाही.
असे शिंदे यांच्या कुटूंबियांनी सांगितले आहे.