
सार्वजनिक बांधकाम खाते माती कधी उचलणार ?
मुंबई दादर पूर्व येथील, सर भालचंद्र रोड, टिळक ब्रिज जवळ, दादर रेल्वे पोलीस वसाहत असून पोलीस उप निरीक्षक इमारतीची, पी डब्ल्यू डी विभागाने इमारत दुरुस्ती केली. इमारत दुरुस्त करून मातीचा ढिगारा इमारती जवळ टाकला. पी डब्ल्यू डी विभागाने, सहा महिने झाले तरीही मातीचे ढिगारे उचलले नाहीत, परिणामी इमारती मधील रहिवाश्यांना फारच त्रास होत असून परिसरात धुळीचे साम्राज्य झाले आहे.
मनपा प्रशासनाने अथवा पी डब्ल्यू डी विभागाने याची त्वरित दखल घेऊन मातीचे ढिगारे उचलावे, अशी रहिवाश्यांनी मागणी केली आहे.