
स्टील रॉड दुरुस्त करावी नागरिकांची मागणी !!
चिंचपोकळी मुंबई पश्चिम येथील ना. म. जोशी मार्गावर, आपोलो मिल समोर, पालिकेने सुलभ शौचालय असून, आत जाण्यासाठी दोन्ही बाजूने स्टील रॉड आहेत. परंतु रॉड फुटपाथ वर झुकलेले असून ते कधीही पडू शकतात, परिणामी अपघात होऊ शकतो. येथे मोठ्या प्रमाणात पादचा-याची वर्दळ असते. तसेच संकुलातील कर्मचारी सतत पाणी ओतून पाण्याची नासाडी करीत असतात, पादचा-यांना तारेवरची कसरत करीत चालावे लागते.
पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन स्टील रॉड दुरुस्त करावा व पाण्याची होत असलेली नासाडी त्वरित थांबवावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.