
सायन येथे जिल्हास्तरीय कोशिकी कराटे असोसिएशन मार्फत चॅम्पियन्सशिप संपन्न !
सायन येथे जिल्हास्तरीय कोशिकी कराटे असोसिएशन मार्फत चॅम्पियन्सशिप संपन्न !
दिनांक १४ मार्च २०२१ रोजी सायन येथे "जिल्हास्तरीय कोशिकी कराटे असोसिएशन" मार्फत चॅम्पियन्सशिप संपन्न झाली. ह्या स्पर्धेमध्ये प्रतिक्षांनगर येथील "सेल्फ डिफेन्स अँड मार्शल आर्टस् अकॅडमी" ह्या क्लासेसच्या एकूण २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण ११ सुवर्ण, १२ रौप्य व ५ कांस्य पदकांची कमाई केली. सर्व विद्यार्थ्याना मुख्य प्रशिक्षण (S.D.M.A.A) संस्थेचे प्रमुख शिहान शंतनु विजय जाधव यांचे लाभले. व ग्रँडमास्टर दिलीप जाधव, ग्रँडमास्टर संतोष खंदारे ह्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
ह्या विद्यार्थ्यांना कायमच खेळासाठी प्रोत्साहित व प्रत्येक बाबतीत सहाय्य केल्याबद्दल शिवसेना नगरसेवक व प्रभागसमिती अध्यक्ष श्री रामदास कांबळे व शिवसेना शाखा क्र. 173 चे शाखाप्रमुख श्री संजय म्हात्रे ह्यांचे विद्यार्थ्यांना सहाय्य केल्याबद्दल आभार मानण्यात आले.