
सिंधुदुर्ग कुडाळ येथे श्री स्वामी बाळूमामा पादुका दर्शन सोहळा संपन्न !
सिंधुदुर्ग कुडाळ येथे श्री स्वामी बाळूमामा पादुका दर्शन सोहळा संपन्न !
सिंधुदुर्ग कुडाळ पुण्यभूमी नगरी मध्ये आदमापूर निवासी प पू श्री संत बाळूमामाच्या पादुकां, क्षेत्र आदमापूर येथून आणून कुडाळ येथे ग्यानू प्रसाद कॉम्प्लेक्स कुडाळ बाजार पेठेत बाळूमामा भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या.
भक्तांच्या हाकेला तत्पर धावत येणारा, भंडारा प्रसादाचे गोरगोरीब दीन दुबळ्यां जीवांना व्याधीमुक्त करून सन्मानाला लावणारा शिवशंभू शंकराचा अवतार असणारा सिध्द योगी संत म्हणजे आदमापूरचा संत बाळूमामा !
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात संत बाळूमामाचे असंख्य भक्त आहेत. जे नित्य नियमाने आदमापूर वारीला जातात व पादुकांचे दर्शन घेतात. अश्या भक्तांना श्री बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने एकत्रित करून जिल्ह्यात कुडाळ येथे परम भक्तीधाम करण्याचा संकल्प करण्यात आला.
कुडाळ पावशी येथे, सात एकर जागेत श्री बाळूमामा यांच्या अलौकिक भक्ती कार्याची ओळख करुन देणारे "श्री संत बाळूमामा आध्यात्मिक केंद्र" उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
नुकतेच बाळूमामा यांच्या पादुका कुडाळ येथे भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत कुडाळ नगरपंचायत येथे प्रथम व विद्यमान नगराध्यक्ष श्री ओंकार तेली यांच्या हस्ते पादुकांचे स्वागत झाले. त्यानिमित्त भजन धनगरी नृत्य, गजानृत्य, कीर्तन, फुगडी, हरिपाठ, आदीचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष-नकुल पंडित व सचिव रामदास तेंडोलकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलें होते. संजय पडते, राजेश महाडेश्वर, राजन बोभाटे, निलेश वरक व चंद्रकांत वाटवे यांचे विशेष सहकार्य होते.