
लोअरपरळ उड्डाण पुलाची खासदार अरविंद सावंत व नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर यांनी केली पाहणी !!
लोअरपरळ उड्डाण पुलाची खासदार अरविंद सावंत व नगरसेविका सौ. स्नेहल आंबेकर यांनी केली पाहणी !!
तीन वर्षांपासून पासून लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक ठरविल्या नंतर जुना ब्रिटिशकालीन ब्रिज पाडून नव्याने काम सुरू झाले. वरळी, शिवाजी पार्ककडे जाणा-या वाहनांना दुस-या मार्गाने वळविण्यात आले होते. लोअर परेल पश्चिमेस कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकातून प्रवासी कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये जातात. त्यांना लोअर परेल रेल्वे ब्रिज ओलांडून तेथे जावे लागते. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. लोअर परेल रेल्वे उड्डाण पूल नव्याने कधी सुरू होणार या बाबत रेल्वे व पालिका प्रशासनाकडे चाकरमान्यांनी विचारणा केल्या.
याची दखल घेऊन नुकतेच (२५ फेब्रुवारी) रोजी दक्षिण मुंबई चे खासदार - अरविंद सावंत, माजी महापौर- नगरसेविका स्नेहल आंबेकर, पालिका उपायुक्त- बालमवार, श्री मुळे, इंगळे सह रेल्वेचे अधिकारी व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत व स्नेहल आंबेकर यांनी ब्रिजच्या कामाची पहाणी करून ब्रिज लवकर कसे तयार करता येईल याबाबत सूचना दिल्या.