भटक्या कुत्र्यांना आवर कोण घालणार ?

भटक्या कुत्र्यांना आवर कोण घालणार ?

          प्राणी मात्रावर दया करा ! त्यांना मायेने वागवा. त्याच्यावर अत्याचार करू नका! अशी घोषणा ऐकण्यास बरी वाटते.  पण ज्याच्यावर दया करण्यात येत आहे. त्यानीच जर मनुष्य प्राण्यावर हल्ला चढविला. तर त्यांनी मदतेची अपेक्षा कोणाकडे करायची? 

           साईबाबा पथ परळ मुंबई आयकर भवन जवळील रस्ता बेस्ट वसाहत कडे जातो. या रस्तावरून रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान भटव-या कुत्रांचा फार वावर असतो. परंतु "कुत्र्या पासून सावधान!" अशी पाटी कुठे नजरेस पहावयास मिळते काय? या रस्त्यावरून २४ तास जा-ये करणा-यांना या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अनूभवयास येत आहे.

       पायी चालणारे, दुचाकी वाहन चालक यांना या कुत्र्याचा उपद्रव होतो..  अंगावर भूंकणे, गाडीच्या मागून धाव घेणे. यामूळे कुत्रे आपले लचके तर तोडणार नाही ना? ह्या भितीपोटी काही दुचाकी वाहन चालक दूभाजकावर आदळता - आदळता वाचले आहेत. तर पायी चालणा-यांनी आपला मार्ग बदलला आहे. आपला रोजगार आटपून घराकडे जाणारे बेस्ट कर्मचारी तर या भटक्या कुत्र्यामुळे भयभीत झाले आहेत. पण ज्याला पोटाची खळगी भरायची असेल त्याला तर हे दिव्य पार पाडावेच लागत आहे. याला पालिका प्रशासन यांनी वेळीच आळा घालावा अशी इथल्या समस्त नागरीकांची मागणी आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week