
आर्थर रोड नाक्यावर पोलीस बिट चौकी हवी. नागरिकांची मागणी !!
आर्थर रोड नाक्यावर पोलीस बिट चौकी हवी. नागरिकांची मागणी !!
मुंबई चिंचपोकळी (पश्चिम) येथील, आर्थर रोड नाका (कॉ. गुलाबराव गणाचार्य चौक) या भागात कायमच वाहतूकीची वर्दळ असते. छोटे-मोठे अपघात होतच असतात. मात्र हा विभाग तीन पोलीस स्टेशन च्या हद्दीत आहे. चिंचपोकळी पूल- काळाचौकी पोलीस स्टेशन, पूर्व बाजू आग्रीपाडा पोलीस स्टेशन, व दक्षिण बाजू- ना.म जोशी मार्ग पोलीस स्टेशन च्या हद्दीत येतो. तिन्ही पोलीस स्टेशन आर्थर रोड नाक्या पासून दूर आहेत. एखादा अपघात झाल्यास वाहतूक ठप्प होते.
वाहन चालक आपल्या मर्जी प्रमाणे सिग्नलवर गाडया थांबवितात, दुचाकी मोटार चालक सुसाट सिग्नल तोडतात. सिग्नल चालू असताना उलट-सुलट दिशेने गाडया काढतात.
वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक सुरक्षित नाही. ज्येष्ठ नागरिक, मुले, महिला यांना जीव मुठीत घरून रस्ता ओलांडावा लागतो. वाहतूक अधिका-यांनी, नागरिका साठी झेब्रा पट्टे व पोलीस प्रशासनाने बिट पोलीस चौकी करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.