
खड्डे बुजवा नाहीतर खड्ड्यात पडा !!
फुटपाथ वरील खड्डे बुजवा
पादचारी त्रस्त.....
मुंबई चिंचपोकळी पश्चिम येथील कॉ. गुलाबराव गणाचार्य चौकातील, अथर्व इमारतीच्या फुटपाथ वर नवीन केबल टाकण्या साठी खोद काम केले, काम झाल्यावर त्यावर माती टाकून खड्डे बुजविले. मात्र पेव्हर ब्लॉक लावले नाहीत. पंधरा दिवस झाले तरीही फुटपाथ सुस्थितीत केलेली नाही,
परिणामी पादचा-यांना व इमारती मधील रहिवाश्यांना नाहक त्रास होत आहे. खड्ड्या मुळे ज्येष्ठ, अंध, गरोदर स्त्रियांना व मुलांना अडकून दुखापत होऊ
शकते.
महानगर पालिका प्रशासनाने दखल घेऊन फुटपाथ वरील खड्डे त्वरित पेव्हर ब्लॉक लावून बुजवावेत.