
महिलांनी आपल्या स्वप्नांना पंख द्या आणि स्वतःवर नक्की प्रेम करा.........अर्चना पवार !
महिलांनी आपल्या स्वप्नांना पंख द्या आणि स्वतःवर नक्की प्रेम करा.........अर्चना पवार !
"महिलांना चूक आणि मूल कधीच चुकले नाहीच पण त्यातूनही थोडासा वेळ स्वतःसाठी काढा, आणि स्वतःवर प्रेम करा" असे संकल्प सहनिवास महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात अर्चना पवार यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलें.
स्टारफॅयर्स इव्हेंट्स पुणे आयोजित राज्यस्तरीय सौन्दर्य स्पर्धेत गोरेगाव (पूर्व) येथील अर्चना अजय पवार- सोनावणे यांनी प्रथम क्रमांकाचा मिसेस महाराष्ट्र प्लॅटिनम हा किताब पटकवला.
त्यांना हा सन्मान किशोरी शहाने व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.
अर्चना पवार यांचा कौतुक सोहळा, संकल्प सहनिवास फेडरल को-ऑप. सोसायटी अंतर्गत संकल्प सहनिवास सांकृतिक मंडळ व संकल्प सहनिवास महिला मंडळ यांनी संकल्प गणेश मंदिराच्या प्रांगणात नुकताच आयोजित केला होता. मुंबईचे उप महापौर- सुहास वाडकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
अर्चना पवार ह्या एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनी मध्ये सिनिअर मॅनेजर या पदावर वर गेली १८ वर्षे कार्यरत आहेत, तसेच इतर विविध कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत असतात. आपले घर संसार सांभाळून त्यांनी हा मान मिळवला आहे.
या कौतुक सोहळ्यास संकल्प सहनिवास फेडरल को-ऑप. सोसायटी अंतर्गत संकल्प सहनिवास सांकृतिक मंडळ व संकल्प सहनिवास महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी व संकल्प संकुलातील असंख्य रहिवाशी उपस्थित होते. अर्चना पवार यांचे विभागातील राजकीय, सामाजिक थरातून फारच कौतुक होत आहे.