
संकल्प सहनिवास महिला मंडळाचे हळदीकुंकू संपन्न !
मुंबई गोरेगाव पूर्व येथील संकल्प सहनिवास फेडरल को-ऑप. सोसायटी अंतर्गत संकल्प सहनिवास सांकृतिक मंडळ व संकल्प सहनिवास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे हळदीकुंकू संकल्प गणेश मंदिर प्रांगणात संपन्न झाले.
महिला मंडळाच्या अध्यक्षा- संजीवनी पानबुडे, सचिव-निकिता साटम, कोषाध्यक्षा - राधिका मयेकर सह वृषाली विचारे, प्रविना मरोलिया, मनीषा मोरे, साक्षी सारंगधर, राजश्री इंगवले, विनया घाग, शलाका महाडिक, शिवानगी व अर्पिता सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संकुलातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
या सोहळ्यात पुणे येथे आयोजित केलेल्या मिसेस ऍक्टिव्ह २०२० च्या विजेत्या अर्चना अजय पवार तसेच वर्षा अय्यर यांचा मुंबईचे उपमहापौर- सुहास वाडकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तद समयी, संकल्प संकुलातील नामांकित गायक-वादक यांनी " संकल्प सुरांचा" वाद्यवृंद प्रथमच सादर केला. रश्मीन मोरे व त्यांच्या वादक-गायक कलाकारांनी, भावगीते, कोळीगीते, अभंग, चित्रपट गीते, शेतकरी गीते, देशभक्तीपर गीते सादर केली, त्यास सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कलाकारांना दाद दिली.
मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांनी सदिच्छा भेट दिली. सर्व नवोदित कलाकारांना शुभेच्छा देऊन कौतुक केले. फेडरल सोसायटी चे अध्यक्ष-चंद्रकांत माने, सचिव- प्रदीप केदारी, खजिनदार- सुबोध महाडिक, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष-धनंजय पानबुडे, सचिव-अजय पवार सह, वअन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.