
शिवडी येथे लवकरच जलतरण तलावाचे निर्माण करणार, आमदार अजय चौधरी !
शिवडी येथे लवकरच जलतरण तलावाचे निर्माण करणार, आमदार अजय चौधरी !
मुंबईतील शिवडी विभागात नागरिकांसाठी लवकरच जलतरण तलावाचे निर्माण करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी परळ येथील बेस्ट वसाहतीत नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या निधीतून सुशोभीकरण करण्यात आलेल्या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात केले. ते पुढे म्हणाले अनिल कोकीळ यांनी या उद्यानाचे जे सुशोभीकरण केले आहे ते खरंच पाहण्यासारखे असून नागरिकांना आता या ठिकाणी जाऊन हे हक्काचे विरंगुळा केंद्र उपलब्धले झाले आहे. कोकीळ यांची काम करण्याची धडपड मी गेली अनेक वर्षांपासून पाहत आलो असून कोरोना काळात देखील त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून रस्स्यावर उतरून काम केले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.
या उद्यानाच्या सुशोभीकरण करण्यासाठी मला बेस्ट प्रशासनासोबत खुप संघर्ष करावा लागला. शेवटी त्याला यश आले असून आमदार अजय चौधरी यांनी बेस्ट प्रशासनासोबत मीटिंग घेऊन मुंबईतील बेस्ट वसाहतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळेच या उद्यानाचे लोकार्पण होऊ शकले. या उद्यानाच्या समोरच जॉगिंग पार्क चे देखील काम सुरू आहे त्याचेही लवकरच लोकार्पण होईल अशी माहिती नगरसेवक अनिल कोकीळ यांनी दिली. या समारंभात बेस्ट वसाहतीतील कोरोना योद्धाना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या समारंभात शिवसेनेचे नगरसेवक दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, सिंधू मसुरकर, शिवसेना संघटक सुधीर साळवी, माजी नगरसेविका वैभवी चव्हाण, शाखाप्रमुख किरण तावडे आणि सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.