जेष्ठांचा एकत्रित वाढदिवस संपन्न !

जेष्ठांचा एकत्रित वाढदिवस संपन्न !

        मुंबई: लोअर परळ (पूर्व) येथील, बी डी डी चाळ १० जवळील, फॅमिली वेल्फेअर एजन्सी, गेली ७२ वर्षे जेष्ठांसाठी कार्य करीत आहे. वेल्फेअर सेंटर मध्ये भजन, संगीत, वाढदिवस, योगा, आरोग्य विषयक चर्चा सत्र, विविध शारीरिक व वैचारिक स्पर्धा, आरोग्य तपासणी व शैक्षणिक सहली विनामूल्य आयोजित केल्या जातात.

       मार्च २०२० पासून कोरोनाच्या महामारी मुळे सेंटर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ज्येष्ठा चे वाढदिवस नुकतेच सेंटर मध्ये एकत्रित साजरे करण्यात आले. एकूण ३० ज्येष्ठाचे वाढदिवस साजरे केले.

      वाढदिवसासाठी अनिता काकडे, रूपाली व्हटकर यांनी विशेष मेहनत घेतली होती. सेंटर च्या संचालिका अल्पा देसाई यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week