
ना.म.जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न !
ना.म.जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न !
ना.म.जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ गेली २६ वर्षे कामगार विभागात रक्तदान शिबिर करत आले आहे.
शिवसेना प्रमुख - बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून ना.म.जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ व के ई एम रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर परेल येथील, बी डी डी चाळ २१ च्या प्रांगणात, मोठया उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिरात ११९ रक्त दात्यांनी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच सुभाष कानडे यांना कोरोना योद्धा व डॉ. वृषाली प्रभाकर जाधव यांना कोरोना योद्धा व वाघिणी पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
शिबिरास माजी आमदार सुनिल शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, नगरसेविका स्नेहल आंबेकर, शिवसेना विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, उपविभाग प्रमुख राम साळगावकर, शाखा प्रमुख गोपाळ खाडये, संदीप वरखडे, नितीन शिरोडकर यांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन रक्त दात्यांचे व शाखा प्रमुख दीपक बागवे, यांच्यासह विश्वस्त, शिबिर प्रमुख व कार्यकर्त्याना शुभेच्छा देऊन कौतुक केले.
के ई एम रुग्णालय रक्त पिढीचे डॉ. ललित सोनावणे, डॉ. अमोल ददारे, डॉ. पूजा दास व कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग होता.