बेस्ट कामगार सेनेच्या प्रयत्नांना प्रचंड यश !

बेस्ट कामगार सेनेच्या प्रयत्नांना प्रचंड यश !

       बेस्ट उपक्रमात विद्युत पुरवठा विभागांत रोजनदारी तत्वांवर कार्यरत असणारे (Casual labour) कर्मचारी वर्गाला लवकरच येत्या काही दिवसांत बेस्टमध्ये कायमस्वरूपी कामावर घेण्यात येणार आहे।

   

सदर कर्मचारी गेले १४ वर्ष बेस्टमध्ये रोजनदारी कर्मचारी ह्या पदावर कार्यरत आहेत, सदर कर्मचारी हे बेस्टमधील कामगार वर्गाचीच मुले आहेत, त्यांच्या ह्या प्रश्नावर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत साहेब हे प्रशासनासोबत पाठपुरावा करत होते, त्यांनी सदर कर्मचारी वर्गाचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई ह्यांच्याकडे मांडला असता सदर बाबतीत तातडीने लक्ष घालण्यासाठी बेस्ट प्रशासनाला सांगण्यात आले, त्या अनुषंगाने बेस्ट प्रशासनाने सदर रोजनदारी कर्मचारी वर्गाला कामावर घेण्यासाठी तातडीने पावले उचलली आहे आणि त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणीचे काम आता सुरू आहे.

      येत्या काही दिवसात सदर कर्मचारी वर्गाला त्यांच्या सर्वाजेष्ठता नुसार यादी बनवून लवकरच बेस्टमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात येणार आहे, असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, बेस्ट समिती सदस्य श्री सुहास सामंत साहेब ह्यांनी सांगितले आहे.

       सदर बाबतीत सर्व रोजनदारी कर्मचारी वर्गाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे, पर्यावरन मंत्री श्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री सुहास सामंत, सरचिटणीस श्री रंजन चौधरी, कार्याध्यक्ष श्री उदयकुमार आंबोनकर, उपाध्यक्ष श्री उमेश सारंग, श्री गणेश शिंदे, श्री कमा नांदोस्कर, श्री अशोक कदम व बेस्ट प्रशासन ह्यांचे आभार मांडले.


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week