
रक्तदानासोबत लवकरच अवयवदान शिबिर देखील घेणार आमदार यामिनी जाधव !
रक्तदानासोबत लवकरच अवयवदान शिबिर देखील घेणार आमदार यामिनी जाधव !
रक्तदाना सोबत लवकरच अवयवदान देखील आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने नुकतेच लालबाग येथील नप्पो हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात दिली. त्यापुढे म्हणाल्या आता रक्तदान सोबत अवयवदान देखील करणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो तसेच अवयवदानामुळे अपंग व्यक्तीला एखादा अवयव मिळून त्याचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे मी भायखळा विधानसभेत ठीकठिकाणी अवयव दान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार यामिनी जाधव यांनी दिली. या शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी युवकांनी आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केले.
तरुण मित्र मंडळाने आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त रक्त संकलित केले. राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन हे १०० वे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही नेहमीच सामाजिक कार्य पुढे असतो रक्तदान हेच श्रेष्ठदान असे असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. या रक्तदानामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी डॉ. प्रागजी वाजा यांनी केले.
तरुण मित्र मंडळाने हे घेतलेले रक्तदान शिबिर आणि त्यातही शंभरावे शिबिर असल्याबाबत मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी आतापर्यंत जास्त रक्तसंकलन केले आहे हा एक विक्रमच आहे त्यांच्या समाजकार्याला आणि मनापासून शुभेच्छा देतो आणि विभागातील नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी देखील शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशी माहिती नगरसेवक अनिल कोकीळ यांनी दिली. या शिबिरामध्ये आमदार अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, शिवसेना भायखळा विधानसभा संघटक विजय दाऊ लिपारे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते