
मनपा आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी केली विविध रुग्णालयाची पाहणी !
मनपा आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी केली विविध रुग्णालयाची पाहणी !
आरोग्य समिती अध्यक्षा, नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी अंधेरी, मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये भेट देऊन सर्व आरोग्य विभागांची पाहणी केली. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. तसेच हॉस्पिटल मधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या अविरत सेवेचे कौतुक करून आभार मानले.
सोबत हॉस्पिटल चे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, डॉ. महारुद्र कुंभार, डॉ. स्मिता चव्हाण, के/पूर्व प्रभाग समिती अध्यक्षा प्रियांका सावंत, मनिष मोरजकर, शैलेश गवारे आणि हॉस्पीटल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.