समाजसेवक राजेश मेहता गऊ भारत भारती पुरस्काराने सन्मानित !

समाजसेवक राजेश मेहता गऊ भारत भारती पुरस्काराने सन्मानित !

           विलेपार्ले येथील युवा समाजसेवक राजेश मेहता यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे गऊ भारत भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेहता यांनी विलेपार्ले विभागात कोरोनाच्या काळात विभागातील गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य आणि जेवण वाटप केले होते. तसेच कोरोना या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांना अनेक रुग्णालयात स्वतः घेऊन जाऊन दाखल केले होते. तसेच या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा मोफत अंतिम संस्कार देखील मेहता यांनी केला होता.

       या कार्याची दखल गऊ भारत भारती या संस्थेने घेतली असून त्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे गऊ भारत भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आम्ही नेहमीच समाजासाठी काम करत असतो. आपण या समाजाचे देणे लागतो आणि या समाजासाठी काम करताना मनाला जो आनंद मिळतो तो शब्दात सांगता येत नाही यापुढे देखील आम्ही असेच कार्य करत राहू असा विश्वास समाजसेवक राजेश मेहता यांनी या समारंभात व्यक्त केला.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर