
माहीम येथील पुरातन दत्त मंदिराला नोटीस दिल्याने भाजपने केले तीव्र आंदोलन !!
माहीम येथील पुरातन दत्त मंदिराला नोटीस दिल्याने भाजपने केले तीव्र आंदोलन !!
मुंबई महानगरपालिकेने माहिम येथील पुरातन दत्त मंदिराला अतिधोकादायक जाहीर करुन (सी 1) निष्कासनाची नोटीस बजावली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ पालिका कार्यालयासमोर आंदोलन करून ही नोटिस मागे घेण्यास भाग पाडले.
मंदिर दुरुस्ती करण्याऐवजी हिंदूंच्या भावनांचा विचार न करता फक्त जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी हा घाट घातला जात आहे, ही बाब कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या माहिम विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी दिला आहे. या दत्तमंदिराला धक्का लागल्यास स्थानिक भाविकांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तेंडुलकर यांनी दिला आहे. माहिम येथील टी. एच. कटारिया मार्गावर १९३३ पासून हे मंदिर आहे. या मंदिरात अनेक भाविक हे दररोज दर्शन घेण्यासाठी येत असतात.