
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले शिवसेना दिनदर्शिकेचे लोकार्पण !
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले शिवसेना दिनदर्शिकेचे लोकार्पण !
शिवसेना शाखा क्रमांक १९८ च्या वतीने दिनदर्शिका २०२१ प्रकाशन सोहळ्याचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, सचिन अहिर (माजी राज्यमंत्री), माजी महापौर नगरसेविका स्नेहल आंबेकर, माजी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंंबूरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वरळी येथील अनेक सामाजिक कार्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. ठाकरे यांनी अनेक निधीमार्फत कामे आणि समस्या त्वरित सोडवण्यात येतील असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी शाखा समन्वयक अनिल मेढेकर, उपशाखाप्रमुख शशिकांत नांदगावकर आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.