एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कामगार सेनेची परिवहन मंत्र्यांसोबत यशस्वी बैठक !

एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कामगार सेनेची परिवहन मंत्र्यांसोबत यशस्वी बैठक !

      महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते तथा पक्ष प्रवक्ते खासदार अरविंदजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस श्री. हिरेनजी रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री श्री. अनिलजी परब यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

       या बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंदजी सावंत यांनी इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचा-यांच्या नियमीत वेतनासाठी एसटी महामंडळाला कोणत्याही प्रतिपुर्ती शिवाय १००० कोटींचे आर्थिक पॅकेज दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे आभार मानले तर १ हजार कोटींचे पॅकेज मिळवण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्या बद्दल परिवहन मंत्री तथा अध्यक्ष अनिलजी परब यांचे विशेष आभार मानले आहे. यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उतेकर, महिला संघटक सौ. स्मिता पत्की, कार्यालय प्रमुख रविंद्र चिपळूण सह कोषाध्यक्ष प्रमोद मिस्त्री उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week